अमित शाहांचं ‘मिशन महाराष्ट्र’!

July 11, 2014 9:21 PM0 commentsViews: 2685

346_amit shah11 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास निकटवर्तीय अमित शाह भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आता कामाला लागले आहे. अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकी लक्षात घेता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे.

अमित शाह महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची दिल्लीत 15 जुलैला बैठक घेणार आहेत. या बैठकीत येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होणार असल्याचं कळतंय. नाशिकमध्ये आज (शुक्रवारी) प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री जाणार आहेत. त्याचबरोबर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी जिल्हा भाजपच्या समित्यांना कार्यक्रम दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 25 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांना बूथनिहाय रचना करावी लागणार आहे.

अमित शाह घेणार बैठक

- दिल्लीत 15 जुलैला भाजप अध्यक्ष अमित शाह घेणार बैठक
– आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीसोबत बैठक
– प्रचारासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री जाणार
– मंत्री संघटनात्मक काम करमार
– संघटना मजबुतीकरणाचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांना दिला
– येत्या 25 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांनी बूथनिहाय रचना करावी
– भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या कोअर कमिटीचा निर्णय

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close