मुंबई चिंब भिजली, समुद्राला आलंय उधाण

July 12, 2014 12:55 PM0 commentsViews: 1461

mumbai maharashtra rain (16)12 जुलै : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुंबानगरीत पावसाने आपला मुक्काम वाढवलाय. आजही मुसळधार पाऊस कायम आहे. मुंबई रात्रीपासून पावसांच्या संततधार सुरूच आहे. आज सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेऊन पुन्हा हजेरी लावली. पावसामुळे समुद्राला उधाण आलंय.

आज दुपारी मोठी भरती येणार आहे. भरतीपूर्वीच समुद्र खवळलाय. समुद्राचं पाणी रस्त्यावर साचलंय. तर ठाण्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरूच होता. रात्रभरात ठाण्यात 149 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी रात्रभरात शहरात 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर उपनगरांमध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुंबईत कुठेही पाणी साचलेलं नाही. लोकलही वेळेवर धावत असल्याचं सांगितलं जातंय. पावसाच्या दमदार हजेरीमुळे मुंबई आणि उपनगरातील धरणांची पातळी सुधारलीय. तानसा धरणक्षेत्रात पावसाची 55.20 मि.मी नोंद झालीय. विहार धरणात 164 मि.मी, तुळशी धरणात 198 मि.मी, अप्पर वैतरणा धरणात 51 .6 मि.मी आणि भातसा धरणात 123 मि.मीची नोंद झाली.

मुंबई धरणक्षेत्रातला पाऊस
(11 जुलै सकाळी 8 ते 12 जुलै सकाळी 8 )

तानसा – 55.20 मि.मी
विहार – 164 मि.मी
तुळशी – 198 मि.मी
अप्पर वैतरणा – 51 .6 मि.मी
भातसा – 123 मि.मी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close