मोबाईलच बलात्काराला जबाबदार म्हणून बंदीची मागणी

July 12, 2014 9:27 PM0 commentsViews: 3568

89kar_mobile_ban12 जुलै : कर्नाटकमध्ये शाळा आणि कॉलेजांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची शिफारस कर्नाटक विधानसभेच्या सभागृह समितीने केलीय. बलात्कार आणि विनयभंगांच्या घटनांसाठी मोबाईलच जबाबदार ठरतात असं अजब कारण या समितीने दिलंय.

18 वर्षांचे होईपर्यंत विद्यार्थ्यांना मोबाईल वापराची परवानगी देऊ नये, असं समितीच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या आमदार शकुंतला शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थीनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा दाखला दिलाय.

तीन लोकांनी एका कॉलेज विद्यार्थिनीला मोबाईलवर कॉल करून बोलावलं. आणि बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कर्नाटकात घडली होती. अशा घटनांचं कारण देत सभागृह समितीने शाळा, कॉलेजमध्ये मोबाईल बंदीची शिफारस केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close