अडवाणींच्या मदतीला धावले के. सुदर्शन

April 25, 2009 12:29 PM0 commentsViews: 11

25 एप्रिलबाबरी मशिद पडावी अशी नरसिंहरावांची इच्छा होती असा आरोप राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे माजी सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी नागपूरच्या एका दैनिकांतून केला आहे. के.सी.सुदर्शन यांनी नागपूरच्या दैनिकांतून केलेला आरोप म्हणजे लालकृष्ण अडवाणींना केलेली मदतच आहे, असा राजकीय विश्लेषकांचा अनुमान आहे. बाबरी मशीद प्रकरणावरून लालकृष्ण अडवाणींना काँग्रेसनं टार्गेट केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सी.सुदर्शन यांनी नागपुरातील एका दैनिकात अडवाणींचा बचाव केलाय. तसंच बाबरी मशीद पडावी अशी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांची इच्छा होती, असा गौफ्यस्फोटही केला आहे. लालू प्रसाद यादव यांनी बाबरी मशीद पाडायला अडवाणी जबाबदार होते असं म्हटलं होतं. लालू प्रसाद यादव हे अर्धसत्य सांगत असल्याचा आरोपही सुदर्शन यांनी केला आहे.बाबरी मशिदीच्या संदर्भात कोर्टानं 3 डिसेंबर 1992 रोजी निकाल दिला असता तर बाबरी विध्वंसाची घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया आरएसएसचे माजी प्रमुख के. सुदर्शन यांनी दिली आहे.

close