दीपक केसरकर शिवसेनेच्या वाटेवर?

July 13, 2014 12:40 PM0 commentsViews: 924

90deepakkesarkar13  जुलै :  सिंधुदुर्गातल्या राणेंच्या दारुण पराभवाचे सूत्रधार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 18 जुलैला वाढदिवशीच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकर याबाबतची अधिकृत घोषणा करतील. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतली आहे.

ही लढाई नारायण राणे या व्यक्तीविरुद्ध नाही तर राणे या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं सांगत आपण राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दीपक केसरकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध केसरकर असा संघर्ष उफाळला होता. याचाच जबरदस्त फटका राणेंना बसला आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाले. शिवसेनेच्या विजयाची पायाभरणी ही केसरकरांच्या राणेविरोधी आंदोलनामुळेच झाली. मात्र केसरकर यांनी राणेंचा विरोध केल्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आता देशात मोदी तर राज्यात युतीची लाट दिसून येत आहे आणि संघर्षाच्या काळात पक्षाकडून साथ न मिळाल्यामुळे केसरकरांनी सेनेची वाट धरली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close