सहाव्या ब्रिक्स परिषदेसाठी मोदी ब्राझीलला रवाना

July 13, 2014 1:40 PM0 commentsViews: 233

9090gujarat_modi

13  जुलै :  पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या दौर्‍यावर निघालेत. तिथं ते सहाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदींचा प्रवास बर्लिनमार्गे होणार आहे. ते उद्या दुपारी ब्राझीलमधल्या फोर्टालेझामध्ये पोहोचतील. त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल तसंच अर्थराज्यमंत्री निर्मला सीतारामन असतील. ब्राझील, चीन, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहे, अनेक विषयांवर या परिषदेत चर्चा होईल.

15 आणि 16 जुलैला होणार्‍या ब्रिक्स शिखर परिषदेत डेव्हलपमेंट बँकांची स्थापना आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या रचनेत सुधारणा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल. यामध्ये मंत्रीस्तरीय चर्चा तसंच मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची चर्चा होणार आहे. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा परदेश दौरा आहे. याआधी त्यांनी भूतानचा दौरा केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close