नरेंद्र मोदींवर टीका केली नाही – राज ठाकरे

July 13, 2014 9:01 PM0 commentsViews: 1247

13  जुलै :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात आपण नरेंद्र मोदींवर टीका केली न्हवती असं त्यांनी म्हटलं आहे. मेळाव्यात आपण सोशल मीडियावर बोललो होतो, अशी सारवासारवही त्यांनी केली आहे. मनविसेत्या मेळाव्यात भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी मोदींची हवा आता विरली आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज ठाकरेंनी आता घूमजाव करत आपण मोदींवर टीका केलीचं नाही तर सोशल मीडियावरचा बदलत्या ट्रेंडबद्दल बोलत होतो असं सांगितलं आहे. तसचं माला जर कोणावर टीका करायची असेल तर ती मी खुलेआम करेन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close