श्रीलंकन खेळाडूंवरील हल्ल्याच्या तपासात लाहोर पोलिस अपयशी

April 25, 2009 1:48 PM0 commentsViews: 1

25 एप्रिलश्रीलंकन क्रिकेट टीमवर लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्याची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून हा अहवाल शुक्रवारी पाकिस्तान सरकारकडे सोपण्यात आला. या अहवालात पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. पोलिस अधिकार्‍यांनी श्रीलंकन क्रिकेट टीमला पुरवलेली सुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती असं या अहवालात म्हटलं आहे. लाहोर हायकोर्टाचे न्यायमूर्ती शब्बार रझा रिझवी यांच्या अध्यक्ष्यतेखालील समितीनं हा अहवाल तयार केलाय. श्रीलंकन खेळाडूंना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेबद्दल हे अधिकारी गंभीर नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

close