अल्पवयीन आरोपींना सज्ञान म्हणून वागवावं – मनेका गांधी

July 14, 2014 12:54 PM0 commentsViews: 48

Menaka on JJ Act 1

14    जुलै :  बलात्काराच्या खटल्यातल्या अल्पवयीन आरोपींवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बलात्कार करणार्‍या आरोपींना अल्पवयीन न समजता त्यांनी सज्ञान आरोपी म्हणून वागणूक द्यावी असं मत केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यासाठी कायदा बदलण्याचेही संकेतही त्यांनी दिले आहेत. मात्र राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी त्याला विरोध केला आहे.

आपण स्वतः यात लक्ष घातलं असल्याचं मनेका गांधींनी सांगितलं आहे. पोलिसांच्या मते 50 टक्के गुन्हे हे अल्पवयीन म्हणजे 18वर्षां पेक्षा लहान मुलांकडूनच होतात. पण हा कायदा बदलून त्यांना जर 18 वर्षे वयापेक्षा मोठ्या असणार्‍या प्रौढांसारखी शिक्षा दिली तर त्यांना वचक बसेल असं मत मनेका गांधी यांनी मांडलं.

तर अशाप्रकारे कायदा बदलणं सोपं नसल्याचं राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी म्हटलं आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या मुलांना सुधारण्यासाठी काही कायदे आहेत. त्यात बदल करणं योग्य नसल्याचं मेमन यांनी सांगितलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close