ब्रह्मदेवदादा माने इंजिनिअरिंग कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांना विषबाधा

April 25, 2009 5:43 PM0 commentsViews: 7

25 एप्रिल, सोलापूरसोलापूरच्या ब्रह्मदेवदादा माने इंजिनियरिंग कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या सर्व मुलांना सोलापूरमधल्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ब्रम्हदेवदादा माने इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलच्या मेसमधल्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. मेसमधल्या दुपारच्या जेवणानंतर सर्व मुलांना अचानक उलट्या जुलाब सुरू झाले. महाविद्यालयाच्या कर्मचा-यांनी या सर्व मुलांना लागलीच दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेले सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणारे आहेत. या विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे.

close