भुजबळांचे खंदे समर्थक कन्हेरे शिवसेनेत दाखल

July 14, 2014 4:54 PM0 commentsViews: 2724

00_kishor kanhere14 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती पण आता भुजबळांचे खास निकटवर्तीय आणि समता परिषदेचे विदर्भ प्रमुख किशोर कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

त्यापूर्वी आज (सोमवारी) सकाळी त्यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कन्हेरे नागपूर जिल्ह्यातल्या काटोल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भुजबळ शिवसेनेत असल्यापासून कन्हेरे त्यांच्यासोबत आहेत.

कन्हेरे शिवसेनेत जात असल्यामुळे भुजबळ आधी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत पाठवून चाचपणी करत आहेत काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. दरम्यान, छगन भुजबळ शिवसेनेत जाणार ही शक्यता खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावलीय. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना त्रास दिला त्यांना शिवसेनेत स्वीकारणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

कोण आहेत किशोर कन्हेरे ?

  • छगन भुजबळ यांच्यासोबत शिवसेनेत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख
  • नागपुरात सुरुवातीला शिवसेनेचं काम केलं
  • भुजबळ काँग्रेसमध्ये गेले तेव्हा त्यांच्या सोबत कन्हेरेही काँग्रेसमध्ये
  • राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर भुजबळांबरोबर कन्हेरेही राष्ट्रवादीत
  • भुजबळांच्या समता परिषदेचे कन्हेरे विदर्भ अध्यक्ष
  • कन्हेरेंच्या अंकित कन्स्ट्रक्शन या कंपनीला भुजबळांनी कामे दिल्याचा झाला होता आरोप

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close