‘त्या’ चौघांमुळे मुंबईत हाय अलर्ट जारी

July 14, 2014 7:38 PM0 commentsViews: 1305

108mumbai_high_alart14 जुलै : कल्याणमधून मे महिन्यात गायब झालेले 4 विद्यार्थी इराकमधल्या जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याची शंका व्यक्त केली जाती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रमाझानच्या काळात सावध राहण्याच्या सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सर्व पोलीस स्टेशन्सना पत्र लिहून दिल्या आहेत.  आएसआयएस (ISIS) आणि आयएसआयएल (ISIL) या दोन संघटना त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे सामाजिक शांतता कायम राखण्यासाठी दक्ष रहा अशी सूचना मारिया यांनी दिलेली आहे.

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात मे महिन्याच्या 25, 26 आणि 27 तारखेला चार मुलं अचानकपणे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी नोंदवली होती. इराकच्या युद्धात सहभागी होण्यासाठी आम्ही चाललो आहोत अशा आशयाचं पत्र त्यातल्या एकानं कुटुंबाला पाठवल्याचं बोललं जातंय.  “हम लोग जिहाद के लिये निकल चुके है, आप हमे खोजने की कोशिश मत करना, अब अपनी मुलाखत जन्नत मे होगी” असा आशयाचा म्रुाकूर पत्रात लिहलेला आहे.

मात्र असलं कोणतंही पत्र आलं नसल्याचा कुटुंबाचा दावा आहे. शिवाय पोलीसही याबाबत काही बोलायला तयार नाहीत. दरम्यान, याबाबत सेंट्रल एजन्सीला माहिती दिली आहे, याचा तपास सेंट्रल एजन्सी आणि लोकल पोलीस करतील आणि ही चार मुले कुठे गेली हे तपासानंतर स्पष्ट होईल असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close