लिट्टेंनी केला तामिळी नागरिकांचा ढालीसारखा वापर

April 25, 2009 5:52 PM0 commentsViews: 1

25 एप्रिल, कोलंबो श्रीलंका लष्करावर हल्ले करण्यासाठी लिट्टेनं तामिळी नागरिकांचा ढालीसारखा वापर केला आहे. अजूनही 20 हजार तामिळी नागरिक लिट्टेच्या ताब्यात आहे. श्रीलंकेत लिट्टे तामिळी नागरिकांचा ढालीसारखा वापर करतंय. लिट्टेचे बंडखोर रणगाड्यातून श्रीलंका लष्करावर हल्ला करतायत. तामिळ लोकांनी बांधलेल्या तात्पुरत्या छावण्यांच्या मागेच हा रणगाडा आहे. लष्करानं प्रत्युत्तर दिलं तर इथल्या लोकांना धोका पोचावा, हा लिट्टेचा उद्देश आहे. श्रीलंकन सरकारनं पायलटसहित विमानाच्या मदतीनं टिपलेल्या दृश्यात तामिळी वाघांची चतुराई उघड झाली आहे.

close