आयोगाचा आपल्यावर ठपका नाही, चव्हाणांचा दावा

July 14, 2014 10:19 PM0 commentsViews: 474

asokh chavan14 जुलै : पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगानं आपल्यावर ठपका ठेवला नाही असा दावा काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलाय. तसंचआयोगाच्या नोटिशीला 20 दिवसांच्या आत उत्तर देऊ असंही चव्हाण यांनी सांगितलंय.

विशिष्ट मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांना नोटीस बजावलीय. पण वर्तमानपत्रांमध्ये प्रायोजित पुरवण्या छापून आणल्याचा ‘पेड न्यूज’चा विषय मात्र निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवलाय.

त्यामुळे निवणूक आयोगाने पेड न्यूजप्रकरणी आपल्यावर ठपका ठेवला नसल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केलाय. पण या प्रकरणातल्या तक्रारदारांनी मात्र अशोक चव्हाणांवर निवडणूक आयोगानं ठपका ठेवल्याचं म्हटलं आहे.

काल रविवारी आयोगाने अशोक चव्हाण यांच्यावर ठपका ठेवलाय. आपल्याला अपात्र का ठरवण्यात येऊ नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस आयोगानं बजावली असून तिला 20 दिवसांच्या आत उत्तर द्यावे असे आदेश दिले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close