मरीन ड्राईव्हजवळ समुद्रात बुडून महिलेचा मृत्यू

July 14, 2014 10:29 PM0 commentsViews: 1993

325marin_driv14 जुलै : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. यामुळे समुद्राला उधाण आलंय. भरतीच्या वेळी समुद्रात जाऊ नका या मुंबई पालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्यानं एका महिलेला जीव गमवावा लागलाय.

आज दुपारी भरती आली असताना समुद्रात गेलेल्या एका महिलेचा बुडून मृत्यू झालाय. मरिन ड्राईव्हजवळ हॉटेल कॉन्टिनेंटल समोर ही घटना घडली. अग्निशमन दल, तटरक्षक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जे.जे. हॉस्पिटलकडे पाठवण्यात आलाय. या महिलेकडे कोणतंही साहित्य नसल्यामुळे ही महिला कोण आहे याची ओळख पटू शकली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close