जागाच तर मागितल्या त्यात चुकलं काय ? -अजित पवार

July 14, 2014 10:46 PM0 commentsViews: 4386

14 जुलै : मी काही भूमिका मांडली तर लगेलच पक्षाच्या वरिष्ठांकडून टीका होते, आता वरिष्ठांना अधिकार आहे. आम्ही काही नाकारत नाही त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण राष्ट्रवादीसाठी जागा मागितल्या तर त्यात चुकलं काय ? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय. जिथे काँग्रेसची ताकद कमी आहे. तिथे राष्ट्रवादीला जागा सोडली पाहिजे आणि जिथे राष्ट्रवादीची ताकद कमी असेल तर आम्ही माघार घेण्यास तयार आहोत असंही पवार म्हणाले. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवारांनी 144 जागांची मागणी करत स्वबळावर लढण्याची मागणी केली होती. पण शरद पवारांनी अजितदादांच्या मागणीतून हवाच काढून घेत चपराक लगावली होती. मागिल आठवड्यात राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत पक्षाचा अध्यक्ष मी आहे, काय निर्णय घ्यायचे ते आम्ही ठरवत असतो आणि मला काँग्रेससोबत आघाडी करायची आहे, असं स्पष्ट करत शरद पवारांनी अजित पवारांना चांगलंच फटकारलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close