ब्रिक्सच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

July 15, 2014 10:31 AM0 commentsViews: 542

The PM Modi  met the Chinese President Mr. Xi Jinping in Fortaleza15   जुलै :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने चांगली चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राझीलमध्ये असून मंगळवारी संध्याकाळी ब्रिक्स देशांची बैठक होणार आहे. यापूर्वी मोदींनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. यामध्ये मुख्यत: सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आग्रह धरल्याचं समजतं. त्याशिवाय दहशतवादावरही चर्चा झाल्याचं समजतं. या भेटीमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आपापल्या देशात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यापार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येतील अशी अपेक्षा आहे. तर पंतप्रधान मोदी नोव्हेंबरमध्ये चीनला भेट देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झालेत. 15 आणि 16 जुलैला होणार्‍या ब्रिक्स शिखर परिषदेत डेव्हलपमेंट बँकांची स्थापना आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या रचनेत सुधारणा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल. यामध्ये मंत्रीस्तरीय चर्चा तसंच मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची चर्चा होणार आहे. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा परदेश दौरा आहे. याआधी त्यांनी भूतानचा दौरा केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close