श्रीलंका लष्कराची लिट्टेविरोधातली कारवाई अंतिम टप्प्यात

April 25, 2009 5:58 PM0 commentsViews: 3

25 एप्रिलश्रीलंका लष्कराची लिट्टेविरोधातली कारवाई अंतिम टप्प्यात आली आहे. श्रीलंकेतल्या उत्तर भागातल्या नो वॉर झोनमधून मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरित केलं जातं आहे. श्रीलंका लष्करानं एक व्हिडिओ शूट केलाय. लिट्टेच्या ताब्यात असलेले हजारो लोक वॉर झोनमधून बाहेर पडत असल्याचं शूट केलं आहे. तीन लिट्टे बंडखोर गर्दीवर गोळीबार करताना त्या व्हिडिओमध्ये दिसत होते. नो फायर झोनमध्ये अजूनही 20 हजार लोक अडकलेले आहेत. लिट्टेकडं आता केवळ पाच किलोमीटरचाच पट्टा राहिलाय. लिट्टेप्रमुख प्रभाकरन, पोट्टू अमान, गुप्तहेर प्रमुख सुसाई, सागरी विभागाचा प्रमुख भानू आणि नादेसन हे लिट्टेचे मोठे म्होरके या चिंचोळ्या पट्‌ट्यात असल्याचं समजतंय. दरम्यान, महिन्याभरापूर्वी प्रभाकरन आपल्या हातातून निसटला, अशी कबुली लष्करानं दिलीये.

close