…तर काश्मीर वेगळा होऊ द्या, वैदिकांची मुक्ताफळं

July 15, 2014 3:33 PM0 commentsViews: 1455

ved pratap 433415 जुलै : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या दहशतवादी हाफीझ सईदची भेट घेतल्यानंतर बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी आणखी एका वाद निर्माण केलाय. संयुक्त काश्मीर वेगळं असावं आणि त्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं नियंत्रण असावं असा वादग्रस्त प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत वैदिक यांनी हा प्रस्ताव ठेवलाय. जर दोन्ही देशाकडील काश्मीर हे स्वतंत्र होण्यास तयार असतील आणि दोन्ही देशांना जर हरकत नसेल काश्मीर वेगळा होण्यास काहीही चुकीचं नाही. जर काश्मीर वेगळा झाला तर उलट पाकिस्तानसाठी ही डोकेदुखी ठरेल असंही वैदिक म्हणाले. या संयुक्त काश्मीरला अधिक स्वायत्तता द्यावी असं मतही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केलंय.

त्यांच्या या मुलाखतीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली. वेद प्रताप वैदिक हा संघाचा माणूस असल्याचं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. वैदिक आणि सईदच्या भेटीबद्दल पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासाला कल्पना होती का याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. संघानं मात्र वैदिक यांच्याशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++