वैदिक संघाचा माणूस -राहुल गांधी

July 15, 2014 4:18 PM0 commentsViews: 840

etv_rahul_gandhi_interview15 जुलै : योगगुरू रामदेव बाबांचे सहकारी पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या दहशतवादी हाफीझ सईदची भेट घेतल्यामुळे प्रकाशझोतात आले.

आता तर त्यांनी काश्मीर वेगळी करण्याची भाषा केली त्यामुळे त्यांच्यावर चोहीकडून टीका होत आहे. तर वेद प्रताप वैदिक हा संघाचा माणूस असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

त्यांच्या या वक्तव्याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. तर मी काँग्रेससोबत काम केलंय आणि भाजपपेक्षा काँग्रेसममधील लोक मला जास्त ओळखतात असं स्पष्टीकरण वेद प्रताप वैदिक यांनी दिलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close