लिट्टे समर्थकांनी केला भारतचा राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न

April 25, 2009 6:07 PM0 commentsViews: 4

25 एप्रिल, कोईमतूर लिट्टे समर्थकांनी भारताचा राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना कोईमतूरमध्ये घडली आहे. त्या आठ लिट्टेसमर्थकांना कोईमतूरमध्ये अटक करण्यात आलीये. श्रीलंकेत लिट्टेच्या पराभवाचे पडसाद तामिळनाडूत उमटत आहेत. लिट्टेविरोधातल्या कारवाईचा निषेधही लिट्टे समर्थक निरनिराळ्या प्रकारे करत आहेत. चेन्नईतही तामिळ नॅशनल सोशलिस्ट पार्टी आणि तामिळ नॅशनलिस्ट लिबरेशन मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत.

close