मी काही ज्योतिषी नाही -अजित पवार

July 15, 2014 7:57 PM0 commentsViews: 3479

nasik_ajit_pawar15 जुलै : मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टीकेल की नाही हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.

कावळा उठायला आणि फांदी तुटायची गाठ पडणार असं काही असू शकतं पण आम्ही आरक्षणाबाबत आमची बाजू मांडलीय असंही पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र मराठा आरक्षणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय.

याच संबंधी पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता, मी काही ज्योतिषी नाही असं उत्तरच पवारांनी दिलं. तसंच निवडणुकांच्या तोंडावर आचारसंहिता लागू असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला पण आमच्या जाहिरनाम्यात मराठा आरक्षणाचं आम्ही वचन दिलं होतं. ते आम्ही आता पूर्ण केलंय असं सांगून श्रेय घेण्यासही पवार विसरले नाही. आपल्याच निर्णयावर सरकारला विश्वास नाही का असा प्रश्न या वक्तव्यामुळं निर्माण झालाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close