मुख्यमंत्री आपल्या गावातून विधानसभेच्या रिंगणात?

July 15, 2014 8:17 PM0 commentsViews: 1510

8cm prithviraj chavan15 जुलै : मुख्यमंत्रीपद वाचल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कामाला लागले आहे. येणार्‍या विधानसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निरीक्षकांकडे केली आहे.

त्यासंदर्भात पक्षाचे निरीक्षक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र मतदार संघाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही स्पष्ट करण्यात आलंय. कराड हे मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असल्यामुळे सेफ जागा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कुठून लढावं हा त्यांचा निर्णय आहे. कराड दक्षिणची जागा त्यांचीच आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसंच कराड दक्षिणचे आमदार आणि माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी 7 वेळा येथून निवडणूक लढवलीय याची आठवणही पवारांनी करुन दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close