करुणानिधींचं उपोषण मागे

April 27, 2009 8:26 AM0 commentsViews: 1

27 एप्रिल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी आमरण उपोषण मागे घेतलं आहे. श्रीलंकेच्या सरकारनं लिट्टेविरुद्ध सुरु केलेली कारवाई थांबवल्यानंतर करूणानिधींनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं समजतंय. श्रीलंकन सरकारनं लिट्टेविरुद्ध सुरु केलेली कारवाई थांबवावी अशी मागणी त्यांनी केली होती. यासंदर्भातपंतप्रधान मनमोहनसिंग यांनी फोनवरुन करुणानिधी यांच्याशी चर्चा केली होती. श्रीलंकेमधल्या तामिळनाडू रहिवाशांची सहानुभूती असल्यामुळे लिट्टेवरील कारवाईविरोधात करुणानिधी यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान श्रीलंका सरकारने युध्दबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता करुणानिधी यांनी हे उपोषण मागे घेतलं आहे. करुणानिधी यांनी उपोषण करण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही निषेधाचा मार्ग म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचं समजतंय. एकीकडे तामिळनाडूमध्ये मतदान सुरू व्हायचं आहे आणि त्याचाच फायदा द्रमुक आणि अण्णा द्रमुक करून घेत असून हे आमरण उपोषण निव्वळ राजकीय खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

close