नितेश राणेंच्या गाडीवर दगडफेक

July 15, 2014 11:08 PM0 commentsViews: 3993

2nitesh_rane_attack15 जुलै : उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या गाडीवर सिंधुदुर्गात अज्ञात लोकांनी दगडफेक केलीये. या दगडफेकीत एक जण जखमी झालाय. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सिंधुदुर्गातील कसाल-मालवण मार्गावर रात्री 9.15 च्या सुमारास रानबंबोळी फाट्यावर ही घटना घडली. रानबंबोळी फाट्याजवळ नितेश राणे यांच्या वाहनाच्या ताफा पोहचला असता अज्ञात लोकांनी दगडफेक केली.

तीन गाड्यांचा हा ताफा होता. यात स्वत: नितेश राणे ताफ्यातील दुसर्‍या गाडीत होते. या प्रकरणी नितेश राणे यांनी ओरोस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close