चेन्नई सुपर किंग्जची टफ फाइट डेक्कन चार्जर्सशी तर मुंबई इंडियन्सची कोलकाता नाईट रायडर्सशी

April 27, 2009 8:32 AM0 commentsViews: 1

27 एप्रिल आयपीएलमध्ये आज महेंद्रसिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्ज आणि विजयाची हॅट्ट्रिक करणारी गिलख्रिस्टची डेक्कन चार्जर्स आमनेसामने आहे. तर सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला ब्रँडम मॅक्यूलमच्या कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. पहिली मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता डरबनमध्ये होईल. तर दुसरी मॅच रात्री 8 वाजता पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळण्यात येणार आहे. आतापर्यंतचे या मोसमातले सर्व सामने जिंकल्यामुळे डेक्कन चार्जर्स अव्वल स्थानी आहे आणि दिल्ली डेअर डेविल दुसर्‍या क्रमांकावर असून तिसर्‍या क्रमांकावर पंजाब किंग्ज इलेवन आहे आणि चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे. तर डेक्कन चार्जर्सच्या पराभवामुळे आतापर्यंत तिसर्‍या क्रमांकावर असणारी मुंबई इंडियन्स टीम पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला टफ फाइट देऊन आगेकूच करण्यासाठी मुंबई इंडियन्स टीमला आजच्या मॅचमध्ये सरशी करावी लागणार आहे.

close