फिरोज खान यांचं निधन

April 27, 2009 9:04 AM0 commentsViews: 3

27 एप्रिल प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फिरोज खान यांचं कॅन्सरनं बंगळुरूत काल मध्यरात्री निधन झालं. ते 70 वर्षांचे होते . गेल्या वर्षीच त्यांचं कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरमुळे ते गेले अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होते. 1970 आणि 1980 चा काळ त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला होता. कुर्बानी, यल्गार, नागिन, दयावान, जाबाज असे त्यांचे काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय सिनेमे आजही चित्रपट प्रेमींच्या लक्षात आहेत. अलिकडेच त्यांचा 'वेलकम' हा विनोदी सिनेमा गाजला होता. त्यांचा मुलगा फरदीन खान हा ही अभिनेता म्हणून सिनेक्षेत्रात काम करत आहे. आजवर दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

close