टोमॅटो रुसला, कोथिंबीर भडकली तर भेंडी 80 रु.किलो !

July 16, 2014 4:41 PM0 commentsViews: 1541

45tomato17 जुलै : राज्यात अनेक भागात पाऊस लांबल्यानं मुंबई आणि ठाण्यात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, फरसबी आणि मटारचे भाव तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

राज्यात यंदाचा जून महिना पूर्ण कोरडा गेला, पाऊस न झाल्याने धरणांनी ही आता तळ गाठला. अशात हवालदिल शेतकर्‍यावर एकीकडे दुबार पेरणीचं संकट आहे तर दुसरीकडे दुष्काळाचं सावट आहे. अगोदरच महागाईचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय

. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी खायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय. वाढत्या महागाईवरून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याकडे सरकारने गांभिर्याने पाहावे अशी मागणी होते आहे. या महागाईमुळे विक्रेतेही चिंतेत आहेत. ग्राहकांच्या रागाचा सामना विक्रेत्यांना करावा लागत आहे.

भाज्यांचे किरकोळ बाजारातले 1 किलोचे दर

  • टोमॅटो 80 ते 90 रुपये
  • मटार, फरसबी 120 रुपये
  • कोबी 70 रुपये
  • वांगी 60 रुपये
  • फ्लॉवर 80 रुपये
  • भेंडी 80 रुपये
  • कोथिंबीर जुडी 80 रुपये

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close