मंदीच्या काळातही अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी तेजीत

April 27, 2009 9:17 AM0 commentsViews: 1

27 एप्रिल विशाखा शिर्केसाडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी तेजीत आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्व असल्यामुळे बाजारात मंदी असूनही सोन्याची मागणी वाढली आहे. जागतिक आर्थिक मंदी, कॉस्ट कटिंगमध्ये गेलेल्या नोकर्‍या आणि त्यातही सगळ्याच वस्तूंचे चढते दर अशा सर्व गोष्टी असल्या तरी भारतीयांसाठी अक्षय्यतृतीयेसारख्या काही परंपरा आजही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच अक्षयतृतीया आली की सोनं खरेदीला गर्दी होते. सोन्याचे भाव पंधरा हजारावर गेले असतानाही सोनं खरेदी सुरूच आहे.लग्नखरेदीचा सिझनही तसाच फिका गेलाय पण अक्षयतृतीयेच्या मुहूर्तासारखा शुभ मुहूर्त ग्राहक टाळणार नाहीत हे ज्वेलर्स जाणतात. मुहूर्त साधून खरेदीला येणार्‍या ग्राहकांप्रमाणेच सोन्याच्या चढ्या दरांचा फायदा घेऊन नवनव्या ज्वेलरी डिझाइन्ससह सोनारांप्रमाणे अक्षय्यतृतीयेला सोनं विकायला येणारेही अनेक आहेत. अक्षयतृतीयेच्या निमित्तानेसोनं खरेदीच्या आकर्षणामुळे तरी ग्राहक दुकानांपर्यंत पोहचतील आणि विक्रीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील अशी अपेक्षा ज्वेलर्सना आहे.

close