भाजपमध्ये प्रवेशासाठी पर्रिकर संपर्कात होते -केसरकर

July 16, 2014 7:38 PM0 commentsViews: 2188

90deepakkesarkar16 जुलै : भाजपमध्ये येण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सातत्याने आपल्या संपर्कात होते आणि त्यांनी सांगितलं असतं तर सावंतवाडीची जागा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कदाचित भाजपसाठी सोडलीही असती पण उद्धव ठाकरेंच्या मनाचा विचार करून आपण शिवसेनेत यायचा निर्णय घेतला असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी केलाय.

मुख्यमंत्री कुणाचा असावा हा जरी सेना भाजपाचा अंतर्गत प्रश्न असला तरी उद्याच्या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेच सक्षम नेतृत्व देऊ शकतात असंही केसरकरांनी स्पष्ट केलंय. सिधुदुर्गातल्या स्वागतानंतर दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत घेतलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. दीपक केसरकर 5 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

मुंबईत ही घोषणा केल्यानंतर आज केसरकर सिंधुदुर्गात दाखल झाले. सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात केसरकरांचं स्वागत केलं. कणकवलीतल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर दीपक केसरकरांनी श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केसरकर शिवसेनेत दाखल झाल्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेनेला मोठी ताकद मिळालीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close