कोल्हापुरात पावसाचा जोर अजूनही कायम, 16 बंधारे पाण्याखाली

July 17, 2014 11:22 AM0 commentsViews: 1717

Kolhapur

17   जुलै : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 16 बंधारे पाण्याखाली गेले असून 10 मार्गांवरची वाहतूक अंशत: बंद पडली आहे. त्यामुळे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान पश्चिम भागात शेतकर्‍यांनी रोप लावणीला सुरुवात केली असून ज्या ठिकाणी मार्ग बंद झालेत त्या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. राधानगरी आणि वारणा धरण 44 टक्के भरलं असून कोदे धरण 100 टक्के भरून वाहू लागलं आहे. शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कायम असून धरणक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. गगनबावडा, चंदगड आणि राधानगरी भागात काल रात्रभर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातल्या भोगावती, तुळशी, कुंभी, घटप्रभा या नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वार्‍यांमुळे झाडं कोसळून वाहतूक बंद झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close