काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला

July 17, 2014 12:48 PM0 commentsViews: 982

kabul17  जुलै :  अफगाणिस्तानमध्ये काबूल आंतराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात 4 तालिबानी दहशतवादी मारले गेले. विमानतळाच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, गोळीबार आणि स्फोट घडवून आणले होते. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानी दहशतवाद्यांनी स्वीकारली आहे

अफगणिस्तानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार आणि रॉकेट हल्ला करत विमानतळाजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घुसले. आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा हल्ला झाला असून, यामध्ये अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा रक्षकांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून काबूल विमानतळावर नाटो फौजांचा हवाई तळ आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close