गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू

July 17, 2014 3:07 PM0 commentsViews: 944

17 जुलै : पुण्यातल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीनं साजरा होणारा उत्सव आणि या उत्सवातलं मोठे आकर्षण म्हणजे ढोल ताशा पथकं. गणेश चतुर्थी दिवशी प्रतिष्ठापणेच्या मिरवणुका असोत वा विसर्जनाची मिरवणूक लहान मुलं-मुली–तरूण -तरूणींचा सळसळता उत्साह डोलताशा वादनाच्‌ा निमित्तानं दिसतो. सध्या सर्वच ढोलताशा पथकांचा सराव सुरू आहे. वंदेमातरम संघटनेतर्फे पुण्यातील ढोलताशा पथकांचं एकत्रित वाद्यपूजन प्रसिध्द तालवाद्य वादक तौफीक कुरेशी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलं. यावेळी ढोलताशा पथकांनी वाद्य वाजवून झलकही पेश केली. तौफीक कुरेशी यांनीही पुण्यातल्या तरूणाईचं कौतुक केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close