डेक्कन चार्जर्सने उडवला चेन्नई सुपर किंग्जचा धुव्वा

April 27, 2009 2:22 PM0 commentsViews: 5

27 एप्रिलआयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स टीमने आपली विजयी घोडदौड कायम राखलीय. चेन्नई सुपर किंग्ज टीमचा आज त्यांनी सहा विकेट्स राखून धुव्वा उडवला. चेन्नई सुपर किंग्जनी त्यांच्यासमोर 166 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण ऍडम गिलख्रिस्ट आणि हर्शेल गिब्स यांच्या जबरदस्त बॅटिंगमुळे डेक्कनने ही मॅच आरामात जिंकली. गिलख्रिस्टने वादळी सुरुवात करुन देताना 19 बॉल्समध्ये 44 रन्स केले. यात त्याने 3 सिक्स आणि 5 फोर लगावले. तर गिब्स 56 बॉल्समध्ये 69 रन्स करत नॉटआऊट राहिला. चेन्नईच्या सुरेश रैनाने मधल्या ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करत डेक्कनच्या बॅटिंगला खिळ बसवली होती. पण अखेर गिब्सने शेवटच्या ओव्हरमध्ये जोरदार सिक्स लगावत टीमला विजयी केलं. त्यापूर्वी चेन्नई टीमने हेडनचे 49 रन्स आणि जेकब ओरमच्या नॉट आऊट 41 रन्सच्या जोरावर 166 रन्स केले. डेक्कन चार्जर्स टीमचा हा सलग चौथा विजय आहे.

close