अल्पवयीन मुलीवर कर्मचार्‍यांकडून शाळेत बलात्कार

July 17, 2014 7:21 PM0 commentsViews: 1425

rape17 जुलै : बंगळुरूमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलीवर कर्मचार्‍यांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. सहा वर्षांच्या या चिमुकलीवर शाळेच्या कर्मचार्‍यांनी शाळेच्या परिसरात बलात्कार केलाय.

ही मुलगी तिच्या वर्गाबाहेर आली तेव्हा या दोन कर्मचार्‍यांनी हे घृणास्पद कृत्य केलंय. या कर्मचार्‍यांविरोधात कोणतीही कारवाई अजून केलेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. हे संतप्त पालकांनी शाळेबाहेर निदर्शनं केली.

दरम्यान, शाळेकडून आता संबंधित पुरावे पोलिसांना सादर करण्यात आले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी शाळेने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय.

या समितीमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश असणार आहे. शाळेच्या कर्मचार्‍यांची आता कसून चौकशी केली जाईल, असंही शाळेकडून सांगण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close