राष्ट्रवादीला धक्का, भुजबळांचे आणखी एक समर्थक शिवसेनेत

July 17, 2014 7:45 PM1 commentViews: 5707

sena vs bhujbal17 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं राष्ट्रवादीला आणखी एक धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे कायदेशीर सल्लागार मंगेश बनसोड यांनी आज (गुरुवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांच्यासोबत सिन्नरचे राजाभाऊ वझे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. किशोर कान्हेरेनंतर मंगेश बनसोड हे भुजबळांचे दुसरे जवळचे सहकारी शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

त्यामुळे भुजबळांची पर्यायानं राष्ट्रवादीची ताकद कमी झालीय. दोनच दिवसांपूर्वी भुजबळांचे खंदे समर्थक किशोर कान्हेरेंनी शिवसेनेत प्रवेश केला. या अगोदर खुद्ध भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती मात्र उद्धव यांनी बाळासाहेबांना त्रास देणार्‍यांना सेनेत प्रवेश नाही असं सांगून दार बंद करुन टाकलंय. पण दुसरीकडे भुजबळांचेच समर्थक सेनेत प्रवेश करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Swapnil shankar Jadhav

    “Senapramukhanna tras denaryanna senechi dar kayamchi band” he Uddhav Thakarench vaktavya ekadam chukich aahe.
    Aatta Rane, Bhujabal ya bulandi tofa senet nakkich pravesh karu ichhit asatil, pan aata tyanna fervichar karava lagel.
    Rane-Bhujbal ekatra yeun SENA-BJP utimadhe Senecha varchashma rahil, takad vadhel.
    Aani Maharashtrian janatecha khara bhrashtachari shatru Rashtravadi nestanabut vhayala madat hoil.

close