केबीसीएल घोटाळ्याच्या ‘भाऊ’साहेबला बेड्या ठोका !

July 17, 2014 4:55 PM0 commentsViews: 1216

kbcl_frd_nashik17 जुलै : गुंतवणूकदारांच्या लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या केबीसीएलचा मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाणविरोधात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा पंचवटी पोलिसांनी दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब चव्हाण याला अटक करावी या मागणीसाठी आज राज्यभरातील एजंटस आणि कंपनीचे सेवक नाशिकमध्ये जमले होते. कान्हेरे मैदानातून मोर्चा काढण्याचं त्यांचं नियोजन होतं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने, त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन केलं. पोलीस उपायुक्तांनी मोर्चास्थळी भेट घेऊन चव्हाण आणि त्याच्या पत्नीला लवकरात लवकर अटक करणार असल्याचं आश्वासन दिलंय. मात्र भाऊसाहेब चव्हाण आपल्या पत्नीसह भारताबाहेर फरार आहे.

नाशिकमध्ये भाऊसाहेब चव्हाण याने केबीसी मल्टिट्रेड या नावाने नाशिकसह राज्यात आणि परराज्यात गुंतवणूकदारांचे जाळे निर्माण करून दामदुप्पट योजनेत करोडो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांकडे आतापर्यंत 146 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

विशेष म्हणजे अडगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी संजय जगताप यातला मुख्य संशयित आरोपी आहे. मात्र या मायाजाळामुळे दुप्पट पैसे मिळण्याच्या आशेनं लोकांनी आपली कष्टाची कमाई केबीसीएलमध्ये गुंतवली होती. त्यांच्यावर आता सर्वस्व गमावण्याची वेळ आलीय.

घोटाळ्याचा मुद्दा लोकसभेत

दरम्यान, महाराष्ट्रात झालेल्या केबीसीएल घोटाळ्याचा मुद्दा आज (गुरुवारी) भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी लोकसभेत उपस्थित केला. किरीट सोमय्यांनी याबाबत अर्थमंत्री अरूण जेटलींकडेही चर्चा केली. याबाबत सोमय्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. या घोटाळ्यातल्या आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close