मलेशियाचं 295 प्रवाशांचं विमान पाडलं !

July 17, 2014 10:13 PM0 commentsViews: 6743

malaysia airlines plane crash_17july201417 जुलै : युक्रेनजवळ रशियाच्या सीमेवर मलेशियन एअरलाईन्सचं प्रवासी विमान कोसळलंय. या विमानात 280 प्रवाशी आणि 15 क्रु मेंबर असे 295 जणांचा सहभाग होता. युक्रेनजवळ मिसाईलचा हल्ला करुन हे विमान पाडण्यात आलं असा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेना केला आहे.

ऍमस्टडॅमहून मलेशियनं बोईंग 777-200 हे विमान कॉलालंम्पूर इथं जात होतं. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हे विमान मिसाईलने पाडण्यात आलंय असा दावा रॉयटर्सने केलाय. युक्रेनच्या प्रधानमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

हे विमान युक्रेनच्या वायु हद्दित प्रवेश केल्यानंतर संपर्क तुटला होता असं मलेशियन एअरलाईन्स म्हणणं आहे. या अगोदरही मलेशिाचं एमएच 370 हे विमान बेपत्ता झालं. या विमानचं गुढ अजूनही कायम आहे. तसंच याच वर्षी मार्च महिन्यात मलेशियाहुन बिजिंगला रवाना झालेलं प्रवासी विमान अपघातग्रस्त झालं होतं. यात 239 जणांचा मृत्यू झाला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close