ओसाम बिन लादेनच्या मृत्यूची शक्यता – झरदारी

April 27, 2009 5:29 PM0 commentsViews:

27 एप्रिलअल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला असावा अशी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांकडे माहिती आहे असं पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी म्हटलंय. लादेनचं अस्तित्व हे रहस्य राहिलं आहे आणि त्याचा मृत्यू झाल्याचीच शक्यता असल्याचं झरदारींनी म्हटलं आहे. पण याबाबतचे पुरावे नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय. आपण अमेरिकशी याविषयावर चर्चा केली असून अजूनपर्यंत त्यांनाही लादेनचा शोध घेता आलेला नाही. उलट अमेरिकेने लादेन पाकिस्तानमध्येच लपला असल्याचं वारंवार म्हटलंय. ओसामाचा शोध सुरू आहे. पण गुप्तचर संस्थांनी तो जिवंत नसल्याची माहिती दिली असली तरी त्याची खात्री झालेली नाही असंही झरदारी म्हणाले आहेत.

close