अग्नितांडव थांबलं, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

July 18, 2014 4:20 PM1 commentViews: 3186

lotus18 जुलै : मुंबईतील अंधेरी लिंक रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली आग आटोक्यात आली. पण दुपारी या आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. या आगीत अग्निशमन दलाचे जवान नितीन येवलेकर यांचा मृत्यू झालाय. येवलेकर हे बोरिवली अग्निशमन दलाचे जवान होते. आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असताना धुरामुळे जीव गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर या आगीत आणखी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. तर 6 जणांची सुटका करण्यात यश आलंय.

बचावकार्यासाठी वायुसेनेच्या जवानांची मदत घेण्यात आली. अडकलेल्या अधिकार्‍यांना बाहेर काढण्यासाठी नेव्हीचं चेतक हेलिकॉप्टर दाखल झालंय. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास लोटस पार्कच्या 21 व्या मजल्यावर आग लागली. मात्र या आगीचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

पण 21 व्या मजल्यावर आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तिथं पर्यंत पोहचण्यात अडथळा येत आहे. 21 व्या मजल्याला लागलेली आग इमारतीत पसरली. या आगीत 21 वा,22 वा मजला जळून खाक झालाय. घटनास्थळी फायरब्रिगेडच्या 18 ते 20 गाड्या दाखल आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत वायुसेनेचे जवानही मदतकार्यासाठी पोहचले आहे. या बिल्डिंगमध्ये अभिनेता ह्रतिक रोशन, दिग्दर्शक प्रकाश झा, बालाजी टेलिफिल्म्स, महुआ चॅनल, अजय देवगन यांचे ऑफिसेस असल्याचं सांगितलं जात आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • वामन

  मुंबईत लोटस बिझनेस पार्कला भीषण आग

  हि कमेंट लिहे पर्यंत एक अग्निशमन दलातील जवान नितीन येवलेकर हे शहीद झाले होते आणि ६ जखमी झाले होते.

  1) सर्व मुर्ख राज्यकर्ते, पालिका आणि अत्यंत हुशार IAS अधिकारी ( जे हि आगेची
  घटना होत असतांना आपल्या AC कॅबिन मध्ये बसून खुर्ची गरम करून पाहत होते)
  ज्यांनि बिल्डर लॉबी आणि चिरीमिरीच्या अमिशासाठी नियम शिथिल केलेत

  आणि

  2)इतक्या उंच इमारतीत आग विझवण्यासाठी स्वयंचलित फायर एस्टिंगीषर किंवा सेन्सर
  नव्हते का ? ह्या गोष्टींची शहानिशा, किंवा सेफ्टी NOC या इमारतीला
  मिळालीच कशी ?

  3)अग्नी प्रतिबंधक उपाययोजना काय होती ती कोण तपासणार ? त्यांनी ते निट तपासले होते का ?

  4)आता काय होणार ते सांगून ठेवतो …
  (A ) “आता राज्य सरकार आणि महापालिका चौकशीचा आदेश देईल आणि अहवाल मागेल ,
  दोषींवर कारवाईचे “पोकळ” आश्वासन मिळेल आणि मग हि सर्व घटना विसरून,
  थंडबस्त्यात जाईल . ”

  (B ) तपासात कुणी दोषी आढळले तर तो मराठी
  कर्मचारी असेल ( महानगर पालिकेतील किंवा अग्निशमन दलातील सेफ्टी NOC
  देण्याच्या विभागातील ) … मग काय …. त्या खालचा मराठी कर्मचारी निलंबित करून कारवाई केल्याचा कांगावा केला जाईल

  5)या घटनेसाठी लागणारे पाणी , डीझेल इत्यादी सरकारी खर्च .. सरकारचाच ना ,
  जिवाची बाजी लावणारे जवान मात्र प्राणाला मुकणार। ह्या अलिशान इमारतीचा
  मालक मात्र श्रीमंत आणि सुखरूप!

  6)अंगपेक्षा चड्डी छोटी ( आधुनिक म्हण ) …।
  आपल्याला ठाऊक आहे कि आधीच आपले अग्निशमन दल कमकुवत आणि इतक्या उंचीच्या इमारतीची आग बुझवाण्यासाठी ते समर्थ नाही .

  7)तरी इतक्या उंच इमारतीची अत्यंत चिंचोळ्या गल्लीत परवानगी मिळतेच कशी ?
  इमारतीची उंची उंचच उंच . अवकाती पेक्षा जास्तच आहे कि नाही हा प्रकार

  8)हरामखोर मंत्र्यांना फिरायला हेलिकॉप्टर … परंतु महाराष्ट्रात साधी ऐअर
  अम्ब्युलंस किंवा ऐअर फायर एस्टिंगीषर नाही ….वाहरे वाह …. आधुनिक दर्जाची
  अग्निशमन दलातील उपकरणे हि उपलब्ध नाही …. आणि अग्निशमन दलातील जवान
  मात्र प्राणाची बाजी लावणार.

  9)भारताची Defence Research and Development Organisation (DRDO )
  संस्था अशी उपकरणे निर्माण करण्यास समर्थ आहे , परंतु परदेशी बनावटीची
  उपकरणे
  घेतली तर त्या मध्ये दलाली आणि भ्रष्टाचार करता येतो ना म्हणून पदेशी
  उपकरणे हवी आपल्या राज्यकर्त्यांना आणि IAS बाबू लोकांना!

  10)खालील अत्याधुनिक तंत्रज्ञान पहा .(जमले तर दलाली न घेता किंवा भ्रष्टाचार न करता आणता आले तर बघा . )

close