आज उद्धव ठाकरेंचं वस्त्रहरण करणार, राणेंचा इशारा

July 18, 2014 1:41 PM2 commentsViews: 5173

Image naryan_rane_+_udhav_thakare_300x255.jpg18 जुलै : काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावून आपल्या गावी परतल्यानंतर नारायण राणे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव उगीच माझ्याविषयी बोलतात. आज संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे, त्यावेळी त्यांचं वस्त्रहरण करणार असा इशाराच राणे यांनी दिलाय.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी काँग्रेसविषयी नाराजीही व्यक्त केलीय. काँग्रेसने पक्षात घेताना जे कबूल केलं होतं ते काहीच दिलं नाही. माझ्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदं दिली नाहीत अशी नाराजी व्यक्त करत सोमवारी राजीनामा देणार असल्याचं त्यांनी पुन्हा एका सांगितलंय.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं हे सांगायलाही राणे विसरले नाही. काल गुरुवारी राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज राणे कोकणात दाखल झाले. राणे यांनी आजपासून 3 दिवसांचा कोकण दौरा सुरू केलाय. राणेंसोबत साधारण शंभर एक कार्यकर्ते आहेत. राणे यांनी चेंबूर, पनवेल, महाड, हातखांबे असा दौरा करत कणकवलीत दाखल झालेत. संध्याकाळी 5 वाजता रत्नागिरीत राणे पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथं ते काय बोलताहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sagar Salunke Patil

  i m waiting ………………. go rane saheb

 • Rahul Kulkarni

  Jheva medhatai patkar bolat hotya , tari pan konich aikle nahi .
  Again u wl say , I ve to do what other channels are doing .
  I wl also wagle tumhi pan.
  Maharashtra has reach heritage . Of dabholkar sir, baba amte and so on , its a cheap publicity stunt .
  Again paid news . I hve seen so many journalist accepting complimenry food . Ok . Happy .
  Still I want to see medhais maharashtra or vishambhar choudhary sir, s maharashtra .
  Is ur office having rain harvesting prorg . No . Water goes to gutter .

close