प्रभाकरनला भारताच्या ताब्यात देऊ – महिंदा राजपक्षे

April 27, 2009 5:32 PM0 commentsViews: 4

27 एप्रिल, कोलंबो लिट्टेप्रमुख प्रभाकरन सापडल्यास त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाईल, असं श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी म्हटलं आहे. आयबीएन-नेटवर्कला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच असं विधान केलं आहे. प्रभाकरन जिवंत सापडला तर त्याच्यावर पहिल्यांदा श्रीलंकेत खटला चालवला जाईल. त्यानंतर भारत सरकारनं मागणी केल्यास त्याला भारताकडं सोपवायला श्रीलंकेची काहीही हरकत नाही, असं राजपक्षे यांनी सांगितलं आहे. सध्या प्रभाकरनला पकडण्यासाठी श्रीलंका लष्कर शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण श्रीलंकेनं लिट्टेशी शस्त्रसंधी केलेली नाही. तर फक्त बॉम्ब आणि तोफांचा मारा थांबवलाय, असं राजपक्षे यांनी स्पष्ट केलं आहे.

close