‘त्या’ विमानाची राखरांगोळी झाली !

July 18, 2014 8:30 PM0 commentsViews: 1742

ऍमस्टरडॅमकडून क्वालालंपूर कडे जाणारं मलेशियन एअरलाईन्सचं विमान युक्रेनजवळ क्षेपणास्त्रानं हल्ला करून पाडण्यात आलं.
या विमानातील सर्व प्रवासी ठार झाल्याची माहिती युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. या विमानातले सर्व कर्मचारी मलेशियाचे नागरिक होते. तर प्रवाशांमध्ये 156 डच, 27 ऑस्ट्रेलियन, 23 अमेरिकी, 12 इंडोनेशियन, 9 इंग्रज, 4 जर्मन आणि एका कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे. विमानाला अपघात झाला त्या ठिकाणी अनेक अवयव विखुरलेले होते अशी माहिती मिळत आहे.  जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रानं हल्ला करून हे विमान पाडण्यात आलं असावं असा निष्कर्ष अमेरिकी अधिकार्‍यांनी काढलाय. हे विमान रशियाच्या सीमेजवळ पूर्व युक्रेनवरून उडत असताना त्याला पाडण्यात आलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close