सुरक्षेअभावी इवलेकरांचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

July 19, 2014 1:04 PM0 commentsViews: 959

nitin evalekar_lotus_fire19 जुलै : मुंबईतील अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्क बिल्डिंग शुक्रवारी आगीच्या भक्षस्थानी सापडली. ही आग सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. पण ही आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर शहीद झाले. अपुरी सुरक्षेची साधनं असल्यामुळे इवलेकर यांचा मृत्यू ओढावला असा आरोप इवलेकर यांच्या कुटुंबीयांनी केला.

ज्या इमारतीत आग लागली होती त्या इमारतीमध्येही फायर सेफ्टी नसल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी लोटस पार्कच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे नितीन इवलेकर यांचं पार्थिव भायखळा मुख्य अग्निशामक केंद्रात आणण्यात येणार आहे. त्यानंतर विरारमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पण इवलेकर यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करायला नकार दिला आहे. सरकारी नोकरीची लेखी हमी आणि मदतीचा चेक दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करायला त्यांनी नकार दिलाय. महापौर सुनील प्रभू इवलेकर कुटुंबियांच्या भेटीला थोड्या वेेळात येण्याची शक्यता आहे. या जवानाच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close