महाठग भाऊसाहेब चव्हाणाच्या मेव्हणीला अटक, गाड्याही जप्त

July 19, 2014 12:42 PM0 commentsViews: 3376

3kbc_scam3219 जुलै : अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या नाशिकमधील केबीसी मल्टिट्रेड कंपनीविरोधात तब्बल चौदाशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तब्बल 10 हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा अंदाज आहे. केबीसी घोटाळ्यातल्या तिघांना अटक करण्यात आलीये. भाऊसाहेब चव्हाण याच्या मेव्हणीलाही अटक करण्यात आलीय. त्याच्या गाड्याही जप्त करण्यात आलीय.

या बोगस कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणला पकडण्यासाठी नाशिकच्या आडगाव पोलिसांनी विशेष टीम नेमली आहे. विशेष म्हणजे याच अडगाव पोलीस स्टेशनमधला पोलीस कर्मचारी संजय जगताप यातला मुख्य संशयित आरोपी आहे.

मात्र या बोगस कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण आपल्या पत्नीसह भारताबाहेर फरार आहे. लाखो गुंतवणुकदारांच्या डोळ्यात पाणी काढणारा भाऊसाहेब चव्हाण गेल्या 5 वर्षांपासून अनेकांसाठी श्रीमंतीचा पासवर्ड झाला होता. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या हरनूल गावचा भाऊसाहेब बीकॉम पर्यंत शिकलाय. एका कंपनीत स्टोअर किपर म्हणून काम करत होता. 20 नोव्हेंबर 2009 ला त्यानं ही कंपनी स्थापन केली. त्यात भाऊसाहेबचा मेव्हणा आणि नाशिकमधलाच पोलीस कर्मचारी संजय जगताप याची महत्वाची साथ मिळाली. जगताप सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. साखळी पद्धतीनं या कंपनीनं लोकांना गुंतवून घेतलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close