राष्ट्रवादी आणि मनसेची छुपी युती : उद्धव ठाकरे

April 28, 2009 8:52 AM0 commentsViews: 1

28 एप्रिलराष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची ठाणे मतदार संघात छुपी युती असल्याचा आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला आहे. काल सोमवारी ठाण्यातल्या जाहीर सभेत उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव घेतलं नाही. पण शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचं नाव घेत किणी हत्या प्रकरण आम्हालाही काढता येईल असा इशारा यावेळी दिला. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेने मनसेवर प्रतिहल्लाच केला असल्याचं या आरोपप्रत्यारोपावरून समोर आलं आहे.

close