युपीत बलात्काराचं प्रमाण सगळ्यात कमी -मुलायम सिंग यादव

July 19, 2014 7:40 PM0 commentsViews: 356

45mulayam singh_news19 जुलै : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी पुन्हा एकदा बलात्काराविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. उत्तर प्रदेशात बलात्काराचं प्रमाण सगळ्यात कमी आहे, असा अजब दावाच सिंग यांनी केलाय.

उत्तरप्रदेशची लोकसंख्या 21 कोटी आहे आणि त्यात बलात्काराच्या केसेसचं प्रमाण सर्वात कमी आहे, असंही ते म्हणायला विसरले नाही.

उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये शुक्रवारी छिन्नविच्छिन्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. या महिलेची ओळख पटली असून या प्रकरणी काही लोकांची चौकशी करण्यात येत आहे.

याच प्रकरणी पत्रकारांनी मुलायम सिंग यांना प्रतिक्रिया विचारली असता अशी मुक्ताफळं उधळली. या अगोदरही मुलायम सिंग यांनी मुंबईत झालेल्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. मुलांकडून चुका होतच असता अशी बडबड सिंग यांनी केली होती. आता पुन्हा एकदा बलात्काराच्या विषयावर त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close