राजस्थान रॉयलचा मुकाबला दिल्ली डेअर डेव्हिल्सशी

April 28, 2009 9:16 AM0 commentsViews: 8

28 एप्रिलआयपीएलमध्ये आज सलग तीन मॅच जिंकणारी विरेद्र सेहवागच्या दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि विजयाच्या शोधात असलेल्या शेन वॅनच्या राजस्थान रॉयल यांच्यात मॅच रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता प्रिटोरियात ही मॅच होईल. आयपीएलमध्ये बलाढ्य समजल्या जाणार्‍या टीमना पराभवाचे धक्के बसत आहेत. तर फारशा अपेक्षा नसलेल्या टीम बाजी मारुन जात आहेत. ऍडम गिलख्रिस्टच्या डेक्कन चार्जर्सनं विजयाचा धडका कायम ठेवत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. आतापयार्पंत खेळलेल्या चारही मॅचमध्ये डेक्कन चार्जर्सनी विजय मिळवत 8 पॉईंटची कमाई केली आहे. तर वीरेद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सनंही विजयी हॅट्‌ट्रीक करत दुसरं स्थान पटकावलंय. सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये दुसर्‍या विजयाची नोंद करत पॉईंटटेबलमध्ये 5व्या क्रमांकावरून 3र्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे तर किंग्ज इलेव्हन पंजाब दोन विजयासह चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. महेंद्रसिंग धोणीची चेन्नई सुपर किंग्ज आणि मॅक्युलमच्या कोलकाता नाईट रायडर्सचा हा आयपीएल हंगाम फारसा लाभदायक ठरताना दिसत नाही. या दोन्ही टीमला 5 पैकी 3 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई पाचव्या तर नाईट रायडर्स 6 व्या क्रमांकावर आहे. गतविजेत्या राजस्थान रॉयलची 7 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यांच्या खात्यातही 3 पॉईंटस जमा आहेत. पहिल्या हंगामात पॉईंटटेबलमध्ये तळाला असलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला या हंगामातही तळाच्या क्रमांकवरच राहावं लागलंय. त्यांच्या टीमला पाच पैकी तब्बल 4 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

close