राजकीय दबावामुळे भ्रष्ट न्यायाधीशाला मुदतवाढ – काटजू

July 21, 2014 10:34 AM0 commentsViews: 385

katju

21   जुलै :  न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक दावा माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. राजकीय दबावाखाली तामिळनाडूतल्या भ्रष्ट ऍडिशनल जजला मुदतवाढ दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मद्रास हायकोर्टाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेत होतं. भ्रष्ट जजला तामिळनाडूतल्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाचा पाठिंबा होता, असं काटजू यांनी म्हटलं आहे. या भ्रष्ट जजला मद्रास हायकोर्टात बढती दिली गेली असंही काटजू यांनी म्हटलं आहे.

माजी सरन्यायाधीश के.जी बालकृष्णन यांच्या कार्यकाळात या भ्रष्ट जजची मद्रास हायकोर्टात नियुक्ती करण्यात आली, असा आरोप काटजू यांनी  केला आहे. त्यावर बालकृष्णन यांनी CNN IBNशी बोलताना ‘आपण पश्चातबुद्धीनं कोणत्याही जजचं किंवा राजकीय पक्षाचं नाव न घेता अनेक गोष्टी बोलू शकतो. त्या जजच्या नियुक्तीला आक्षेप घेतला गेला होता आणि कृपया न्या. पसायत यांचा निकाल वाचा. एखाद्या जजचे राजकीय पक्षाशी संबंध असल्याचा आरोप असेल तर त्याची बदली करावी लागते’, असं माजी सरन्यायाधीश के.जी बालकृष्णन यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणातील प्रत्येक गोष्टीची नोंद झालेली आहे. मी काय केलं, काय नाही केलं या सगळ्याची कारणांसकट नोंद करण्यात आलेली आहे. मी माझ्या आयुष्यात कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही, असं स्पष्टीकरण जस्टिस लाहोटी यांनी काटजूंच्या आरोपांवर दिलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close