2011 मध्ये होणारा वर्ल्ड कप 18 फेब्रुवारीपासून

April 28, 2009 2:18 PM0 commentsViews: 5

28 एप्रिल 2011 मध्ये होणार्‍या क्रिकेट वर्ल्ड कपचा कार्यक्रम आज निश्चित करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार 18 फेब्रुवारी 2011 मध्ये स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. आज मुंबईत वर्ल्डकप आयोजन समितीच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे संयुक्तरित्या वर्ल्ड कपचं आयोजन करणार होते. पण श्रीलंकन क्रिकेट टीमवर पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचं यजमानपद रद्द करण्यात आलं. त्यामुळे वर्ल्डकपचं मुख्यालयही आज लाहोर ऐवजी मुंबईमधे हलवण्यात आलंय. आज ठरलेल्या नव्या कार्यक्रमानुसार भारतात 29, श्रीलंकेत 12 आणि बांग्लादेशमध्ये 8 मॅच खेळवण्यात येतील. 19 फेब्रुवारीपासून मॅचेसना सुरुवात होईल. स्पर्धेच्या दोन क्वार्टर फायनल मॅच बांग्लादेशमध्ये, एक भारतात तर उरलेली एक क्वार्टर फायनल मॅच श्रीलंकेत खेळवण्यात येईल. दोन सेमी फायनल मॅच भारत आणि श्रीलंकेत होतील, तर फायनल मॅच भारतात होईल. मॅचची ठिकाणं आणि फायनल वेळापत्रक काही दिवसातच निश्चित करण्यात येईल.

close